Share

“अशा नतद्रष्टांच्या छाताडावर पाय ठेवून…”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुंबईत येऊन व्यापार-धंदा करायचा, मिळेल त्या मार्गाने पैसा कमवायचा आणि “मराठीत व्यवहार करा, दुकानावर मराठी पाट्या लाव ” असे सांगितले की, काही महाभाग मराठीविरुद्ध कोर्टात जाणार. अशा अतिशहाण्यांची मस्ती उतरविण्यासाठी मराठी भाषा भवनात स्वतंत्र कक्ष स्थापन व्हायलाच हवा. मराठी भाषा महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात सक्तीची असू नये म्हणून भाजपचे किरीट सोमय्यासारखे लोक कोर्टात गेले. अशा लोकांनी मराठी माणूस आणि मराठी भाषेविरुद्ध उभा दावा मांडला आहे. हे लोक मराठी भाषा भवनाच्या उभारणीत अडथळे आणण्यासाठी ‘ईडी’चा वापर नक्कीच करतील, पण अशा नतद्रष्टांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी भाषा भवन उभे करावे लागेल. असे शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सामना अग्रलेखातून म्हटले आहे.

राज्यात मराठी संस्कृती, मराठी भाषेचा ठसा पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘ज्ञानपीठ’कार कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या संदर्भात व्यक्त केलेली खंत आजही अस्वस्थ करीत आहे. मंत्रालयाच्या पायरीवर मराठी भाषा फाटक्या वस्त्रात भिकारणीसारखी उभी आहे, अशी खंत कुसुमाग्रजांनी व्यक्त केली होती. मंत्रालयात, राजकीय व्यवहारात मराठीचा वापर करायला हवा. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, संस्कृती, सण उत्सव यासाठी मराठी भाषा भवनातून मोठमोठय़ा मोहिमा राबवायला हव्यात. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच बाबरीवर हातोडे मारून पुन्हा “होय, बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे,” असे ठणकावणारे मर्द सेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषा मराठी. “अमरनाथ यात्रेकरूंच्या केसाला हात लावाल तर याद राखा” या इशाऱ्याने पाकड्या दहशतवाद्यांना धडकी भरवणारी भाषा मराठी. अशा मर्दानी मराठी भाषेचे भवन उभे राहत आहे. या कार्यात अडथळा आणाल तर याद राखा! असा इशारा संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बाळासाहेबांनी मराठी भाषा व अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेना काढली- संजय राऊत

“अजान सुरु झाली अन् गृहमंत्र्यांनी थांबवले भाषण”, व्हिडीओ व्हायरल

“मर्दानी मराठी भाषेचे भवन उभे राहतेय यात अडथळा आणाल तर…”, शिवसेनेचा इशारा

IPL 2022 SRH vs LSG : राहुलसेनेनं वेग पकडला..! लखनऊ सुपर जायंट्सची सनरायझर्स हैदराबादवर मात

IPL 2022 SRH vs LSG : लखनऊचं हैदराबादला १७० धावांचं आव्हान; राहुल, हुडाची अर्धशतके!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!