🕒 1 min read
मुंबई: बाबरीवर हातोडे मारून पुन्हा “होय, बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे,” असे ठणकावणारे मर्द सेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषा मराठी. “अमरनाथ यात्रेकरूंच्या केसाला हात लावाल तर याद राखा” या इशाऱ्याने पाकड्या दहशतवाद्यांना धडकी भरवणारी भाषा मराठी. अशा मर्दानी मराठी भाषेचे भवन उभे राहत आहे. या कार्यात अडथळा आणाल तर याद राखा! असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सामना अग्रलेखातून दिला आहे.
मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, संस्कृती, सण उत्सव यासाठी मराठी भाषा भवनातून मोठमोठय़ा मोहिमा राबवायला हव्यात. मराठीचे शिलालेख, पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे यातून ज्ञान मिळेल, पण मुंबईसह महाराष्ट्रात, जगाच्या पाठीवर मराठी तरुणांनी उत्तुंग झेप घ्यावी यासाठी मराठी भवनातून विशेष कार्य घडायला हवे. हे सर्व काम गेली कित्येक वर्षे शिवसेना एका इमानाने करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मराठी भाषा व अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेना काढली. मराठीद्वेष्टय़ांच्या कानफटात मारली, मराठी माणसांना ओळख दिली , स्वाभिमान दिला. असे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
“महाराष्ट्रात राहताय ना मग शिवरायांना मुजरा करावाच लागेल, मराठी भाषा शिकावीच लागेल” याच आग्रहातून महाराष्ट्र गौरवाचे तेज वाढत गेले. दिल्लीच्या तख्तालाही अनेकदा महाराष्ट्रापुढे नमावे लागले ते तेजस्वी मराठी भाषेच्या धारदार तलवारीमुळे. आज पंचतारांकित हॉटेलात, आकाशातील विमानातही ‘जय महाराष्ट्र’ कानी पडते ते शिवसेनाप्रमुखांच्या मराठीबाबतच्या दूरदृष्टीमुळेच. भाषावार प्रांतरचनेनुसार देशात भाषिक राज्ये निर्माण झाली, पण मराठी भाषिकांना त्यांचे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी पाच वर्षे झगडावे लागले. म्हणून मराठी माणसाने सदैव सावधान राहायला हवे. महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर राज्यांना भूगोल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून हा इतिहास आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“मर्दानी मराठी भाषेचे भवन उभे राहतेय यात अडथळा आणाल तर…”, शिवसेनेचा इशारा
IPL 2022 SRH vs LSG : राहुलसेनेनं वेग पकडला..! लखनऊ सुपर जायंट्सची सनरायझर्स हैदराबादवर मात
IPL 2022 SRH vs LSG : लखनऊचं हैदराबादला १७० धावांचं आव्हान; राहुल, हुडाची अर्धशतके!
राज्य सरकारमध्ये भ्रष्ट्राचाराची २०-२० मॅच; फडणवीसांचा आरोप
“मोदी साहेबांच्या कृपेने काही दिवसात पेट्रोल 150 रुपये होईल”- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
