🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू लागले आहे. असे असतांनाच यावरून आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘अगोदर लाव रे तो व्हिडीओ आणि आता लाव रे हा व्हिडीओ, दूध का दूध पानी का पानी’, असे आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, याविषयी काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील भाष्य असून प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना थोरात म्हणाले की,‘राज ठाकरे हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते असून मधल्या काळात त्यांची भाषण लोकप्रिय झाली ती ‘लाव रे तो व्हिडीओ’ या त्यांच्या फॉर्म्युल्यानंतर. परंतु दोनच वर्षांमध्ये त्यांनी एवढा मोठा युटर्न घेतला आहे की, आता त्यांची अवस्था पाहून, कोण होतास तू, काय झालास तू? असे म्हणावे लागेल.’
महत्वाच्या बातम्या:
- “अजान सुरु झाली अन् गृहमंत्र्यांनी थांबवले भाषण”, व्हिडीओ व्हायरल
- बाळासाहेबांनी मराठी भाषा व अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेना काढली- संजय राऊत
- मनसेचा हनुमान चालीसा कार्यक्रम पोलिसांकडून रद्द!
- उद्धवजी पुन्हा सांगतो सावध राहा! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा सल्ला
- “शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
