मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या काल रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी किरीट सोमय्यांवर शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झाले. किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांना बाजूला करत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याने गाडीची काच फुटली व किरीट सोमय्यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली. या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार राम सातपुते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत शिवसेनेच्या गुंडांचा नंगानाच पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आशीर्वादाने सुरु आहे त्याला भाजपा पुरून उरल्याशिवाय राहणार नाही.महाराष्ट्राची सत्ता एका माफिया टोळीच्या हातात आहे असं दिसतंय.भाजपा नेते @KiritSomaiya यांच्यावर झालेला हल्ला नामर्दानगीच लक्षण आहे. @Dev_Fadnavis pic.twitter.com/cJWh37FDti
— Ram Satpute (@RamVSatpute) April 24, 2022
“मुंबईत शिवसेनेच्या गुंडांचा नंगानाच पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आशीर्वादाने सुरु आहे, त्याला भाजपा पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राची सत्ता एका माफिया टोळीच्या हातात आहे असं दिसतंय. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला नामर्दानगीचं लक्षण आहे” अशी खोचक प्रतिक्रिया राम सातपुते यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त ठाकरे यांचे नोकर –
कालच्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी पोलिसांसह ठाकरे सरकारवर निशाणा साधत हल्ला चढवला. म्हणाले, “पोलीस आयुक्त संजय पांडे उद्धव ठाकरे यांचे नोकर असल्यासारखे वागत आहेत. पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच पोलिसांनी मला शिवसेनेच्या गुंडांच्या हवाली केले. या हल्ल्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

