Share

Sanjay Raut | सरकार बदलेल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण करू ; संजय राऊत यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : मुंबई पोलिसांच्या EOW टीमने INS विक्रांत विमानवाहू युद्धनौका वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना क्लीन चिट दिली आहे. यासोबतच टीमने या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्टही कोर्टात दाखल केला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला, ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध क्राउडफंडिंगद्वारे गोळा केलेल्या सुमारे ५७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. दरम्यान यावर शिवसेना खासदार संजय राऊत इशारा दिला आहे.

संजय राऊत म्हणाले, “आम्ही त्याच्याकडे पाहत नाही. सरकार बदलल्यावर अशा अनेक गोष्टी अपेक्षित असतात. त्यातलीच ही एक गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. विक्रांत संदर्भात पैसै गोळा झाले आहेत. हे सर्वांनी पाहिले आहे. मग तो एक रुपया असेल किंवा ५० कोटी असतील. पैशाचा अपहार हा झालेला आहे. पैसे राजभवनात गेले असे म्हणतात. मात्र राजभवन म्हणते पैसे आले नाहीत. हाच सर्वात मोठा पुरावा आहे. जरी आज सोमय्यांना क्लीन चिट मिळाली असेल. तर २०२४ ला हे प्रकरण समोर येणार नाही, असे नाही. सरकार बदलेल, कोणतेही सरकार कायमस्वरूपी नसते. सरकार बदलेल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल.”

दरम्यान पोलिसांच्या अहवालानुसार या प्रकरणाच्या तपासात कोणताही गुन्हा आढळून आलेला नाही. तसेच सोमय्या यांचा कोणाचीही फसवणूक करण्याचा हेतू नव्हता असे आढळून आले. या मोहिमेसाठी २,००० रुपयांची देणगी देणारे ५३ वर्षीय माजी सैनिक बन भीमराव यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!