मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या काल रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी किरीट सोमय्यांवर शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झाले. किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांना बाजूला करत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याने गाडीची काच फुटली व किरीट सोमय्यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली होती.
या पाश्वर्भूमीवर किरीट सोमय्या आज पत्रकार परिषदेत म्हणाले, “माझ्यावरील कालचा हल्ला हा ठाकरे सरकार स्पॉन्सर्ड होता. मी पोलीस ठाण्यात रात्री साडेनऊ वाजता येणार असल्याचे अगोदरच कळवले होते. त्यानुसार शिवसेनेचे ७० ते ८० गुंड अगोदरच पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. काहीजण पोलीस स्टेशनच्या आवारात उभे होते. आतमध्ये जातानाही त्यांनी मला शिवीगाळ केली. पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मी बाहेर पडण्यापूर्वी माझ्यावर हल्ला होऊ शकतो असे सांगितले होते. पण पोलिसांनी आम्ही शिवसैनिकांना दूर नेले आहे, सगळी चोख व्यवस्था केली आहे असे सांगितले. पण पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच पोलिसांनी मला शिवसेनेच्या गुंडांच्या हवाली केले”.
पोलीस आयुक्त उद्धव ठाकरे यांचे नोकर –
काल या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी लगेच वांद्रे पोलिसात धाव घेतली होती. यांच्या गाडीवर फेकण्यात आलेला दगड देखील त्यांनी पोलिसांना आणि माध्यमांना दाखवला होता. पोलीस स्टेशनच्या आवारात शिवसैनिकांचे ७० ते ८० गुंड कसे पोहोचले आहेत. पोलीस आयुक्त जोपर्यंत इथं येऊन अधिकाऱ्यांना सस्पेंड करत नाहीत तोपर्यंत या ठिकाणावरून हलणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसैनिक हल्ला करतात. उद्धव ठाकरे यांच्या गुंडांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, पोलीस आयुक्त संजय पांडे उद्धव ठाकरे यांचे नोकर असल्यासारखे वागत आहेत. अशी भूमिका किरीट सोमय्यांनी काल घेतली होती.
महत्वाच्या बातम्या –


