Share

Winter Session 2022 | बाप्पू आणि पप्पू यांनी अधिवेशनामध्ये गोंधळ घालू नये ; रवी राणा यांची ठाकरे पिता-पुत्रावर टीका

Published On: 

🕒 1 min read

Winter Session 2022 | अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदा नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवर आमदार रवी राणा यांनी टीका केली आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी विदर्भाच्या लोकांना न्याय देण्यासाठी परंपरेला कायम ठेवत नागपुरात अधिवेशन ठेवले. उद्धव ठाकरे म्हणजे बाप्पू आणि त्यांचा मुलगा पप्पू आदित्य ठाकरे हे दोघेही विदर्भाच्या धरतीवर अधिवेशनासाठी आले आहेत. त्यांना विनंती आहे की अधिवेशन पूर्णपणे चालू द्या. कुठल्याही प्रकारचा गोंधळ आणि राजकारण करु नका. तुमच्या हातात सत्ता दिल्यानंतर तुम्ही ते करु शकले नाही,” असे रवी राणा म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला सामना बघायला मिळू शकतो. शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे शाब्दिक हल्लाबोल देखील होऊ शकतो.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांची मिटींग बोलावली आहे. या मिटींगमध्ये उद्धव ठाकरे आमदारांना कानमंत्र देण्याची शक्यता आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न, भाजप नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान, हे मुद्दे शिवसेना आमदार उपस्थित करु शकतात.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!