मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादने आपला विजयी रथ कायम राखला आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB vs SRH) ९ गड्यांनी मात दिली. जलदगती गोलंदाज मार्को जानसेनचा झंझावाती स्पेल आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेल्या साथीच्या जोरावर हैदराबादने बंगळुरूला (RCB vs SRH) धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात कप्तान केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा यांनी ६४ धावांची सलामी दिली. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि विल्यमसनने आठव्या षटकातच हे लक्ष्य गाठले. अभिषेकने ८ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा केल्या. विल्यमसन १६ आणि राहुल ७ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत आरसीबीची दाणादाण उडवली. हैदराबादने गुणतालिकेत १० गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे.
बंगळुरुचा डाव
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने धडकी भरवणारा स्पेल टाकत बंगळुरूच्या पहिल्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. जानसेनने बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसचा (५) सुंदर त्रिफळा उडवला. तर विराट कोहली आणि अनुज रावत यांना खातेही खोलू दिले नाही. विराट स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा गोल्डन डकचा शिकार बनला. त्यानंतर आलेले ग्लेनॅ मॅक्सवेल (१२), सुयश प्रभुदेसाई (१५) आणि शाहबाझ अहमद (७) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. स्पर्धेत तुफान फॉर्मात खेळणारा दिनेश कार्तिक फिरकीपटू सुचितचा बळी ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. टी. नटराजन आणि भुवनेश्वर यांनी आरसीबीच्या शेपटाला जास्त वळवळू दिले नाही. भुवीने मोहम्मद सिराजला बाद करत बंगळुरुचा डाव १६.१ षटकात ६८ धावांवर संपवला. हैदराबादकडून जानसेनने २५ धावांत ३, नटराजनने १० धावांत ३ बळी घेतले. सुचितला २ तर भुवनेश्वर आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी १ बळी मिळाला.
The #Risers have put in the hard yards, and are eyeing a 5️⃣th straight win tonight. ????
Ready for the Challenge-rs! ????#RCBvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/7USL9OjIHb
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 23, 2022
Clinical Sunrisers Hyderabad thump RCB by 9 wickets with 12 overs to spare
Jansen – 3/25 | Natarajan – 3/10 | Abhishek – 47(28)#IPL2022 #RCBvSRHhttps://t.co/mZBvSWG6DU pic.twitter.com/0XutaSncby
— Cricbuzz (@cricbuzz) April 23, 2022
दोन्ही संघांची Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, जगदीशा सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन, उमरान मलिक, टी. नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

