Share

Ravi Rana | “काँग्रेसच्या वतीने उद्धव ठाकरे माफी मागणार का?”; ‘त्या’ प्रकरणावरुन रवी राणा यांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

Ravi Rana । अमरावती : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी “स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती”, असं विधान केलं. त्यावरून वाद चालू असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं वक्तव्य केलं.

अशातच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप (Virendra Jagtap) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं. राज ठाकरे यांच्या गोरेगाव येथील सभेनंतर वीरेंद्र जगताप यांनी सावरकर देशाला कलंक होते असं वादग्रस्त विधान अमरावतीत केलं. दरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन देखील केले आहे. वीरेंद्र जगताप यांच्या या वक्तव्यानंतर भाजप व काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे.

भाजपने नांदगाव खंडेश्वर येथे वीरेंद्र जगताप यांचा निषेध करत पुतळा जाळण्यात आला. या वादात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी सुद्धा उडी घेतली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणारे वायफळ वीरेंद्र जगताप (Virendra Jagtap) यांच्या  यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बसतात, असं त्या म्हणाल्या.

त्याचबरोबर सावरकरांबद्दल खालच्या स्तराचे वक्तव्य करतात याला उद्धव ठाकरे समर्थन करतात का? असा खोचक सवाल रवी राणा यांनी केला. तसेच काँग्रेसच्या वतीने उद्धव ठाकरे माफी मागणार का?, असा सवालही रवी राणा यांनी उपस्थित केलाय. यावर ठाकरे गटाकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!