Share

Navneet Rana | “…तर मला अभिमान वाटेल!”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाला नवनीत राणांची सहमती

Published On: 

🕒 1 min read

Navneet Rana | मुंबई :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आणि भाजप (BJP) नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांचा वाद सर्वांनाच माहिती आहे. मात्र, नवनीत राणा यांच्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याला नवनीत राणांनी सहमती दर्शवली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचं स्वागत होत असतानाच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचं स्वागत केलं आहे. तसं झालं तर आम्हाला अभिमानच वाटेल, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान, महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री महिला व्हावी हे शब्द उद्धव ठाकरे यांच्या मुखातून पचत नाहीत. ज्याना स्वतः मुख्यमंत्री व्हायची हौस आहे. ते दुसऱ्याला मुख्यमंत्री व्हायचे स्वप्नं कसे पाहू शकतात? उद्धव ठाकरे यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात, अशी टीका करतानाच जर महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल, असी टीका देखील नवनीत राणा यांनी केली आहे.

दरम्यान, आम्ही महिला खूप टॅलेंटेड आहे. पहिली महिला राष्ट्रपती आमच्याच जिल्ह्यातून झालेली आहे. मला त्याचा अभिमान आहे. पण ज्यांनी घोषणा केली, त्यांच्या मुखातून हे शब्द पचत नाहीत, असं त्या म्हणाल्या. आम्ही उद्धव ठाकरेंचं विधान फार गांभीर्याने घेत नाही. पण महिला मुख्यमंत्री झाली तर आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल, असं देखील नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!