🕒 1 min read
मुंबई : आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटर आणि इतर सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या सगळ्या शुभेच्छांमध्ये एक व्यक्ती अशी आहे ज्यांच्या शुभेच्छा फडणवीसांसाठी खूपच खास असणार आहेत. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्या आहेत मिसेस उपमुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस. अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांना खूपच अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारं एक ट्विट अमृता यांनी केलं आहे. ट्विट मध्ये त्या म्हणतात कि, “जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत- कायम विकासाचा गोडवा पसरविणारे Devendra Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !”
जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते.
अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !#Devendra_Fadnavis pic.twitter.com/bHtz03Eo9Q— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 22, 2022
या ‘गोड’ ट्विटबरोबरच त्यांनी एक छान असा फोटो ही पोस्ट केला आहे. ज्यात अमृता स्वतः फडणवीसांना जिलेबी भरवत आहेत. या ट्विटला काही क्षणातच भरभरून लाईक्स आणि कॉमेंट्स आल्या आहेत. तसेच हा फोटोही सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Suhas Kande : आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर मी ताबडतोब राजीनामा देतो; सुहास कांदे यांचे आव्हान
- VVS Laxman : प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची बेंच स्ट्रेंथ वाढवण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणने सुचवली भन्नाट कल्पना
- Sudhir Mungantiwar | “तुमच्या बापाचा माल आहे का?” ; पूरपरिस्थितीची पाहणी करताना सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर संतापले
- Sanjay Raut : द्रौपदी मुर्मू यांच्या विजयात शिवसेनेचा खारीचा वाटा – संजय राऊत
- Suhas Kande : हिंदुत्वासाठी लढलो ही चूक झाली का?; सुहास कांदे आदित्य ठाकरेंना भेटून जाब विचारणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
