Share

Suhas Kande : आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर मी ताबडतोब राजीनामा देतो; सुहास कांदे यांचे आव्हान

Published On: 

🕒 1 min read

Suhas Kande । नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. आमदारानंतर आता १२ खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना समर्थन दर्शवल आहे. तर दुसरीकडे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा काढण्यास सुरवात केली आहे. यादरम्यान काल भिवंडीत बोलताना ते म्हणाले कि, लाज असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, असं आव्हान देतानाच हे सरकार जास्त काळ चालणार नाही. दोन लोकांचं मंत्रिमंडळ आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे लिहून घ्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आता या टीकेला शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

सुहास कांदे माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, आदित्य ठाकरे आणि ठाकरे घराण्याबद्दलही आदर आहे. पण माझे आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरे आदित्य यांनी नांदगाव विधानसभेच्या मतदारांसमोर द्यावीत. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पर्यटन खात्याचा निधी का दिला नाही? पर्यटन खात्याचा एक प्रकल्प नांदगावमध्ये दाखवा. तसेच त्यांनी जर माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर मी ताबडतोब त्याच मिनिटाला राजीनामा देतो. मी परत निवडणूक लढवतो, असं आव्हानच सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.

निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांचा आज मनमाड दौरा असणार आहे. यावेळी सुहास कांदे पाच हजार कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत. हिंदुत्वासाठी लढलो यात माझी काय चूक झाली? असा सवाल सुहास कांदे आदित्य ठाकरे यांना करणार आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरूनही ते आदित्य ठाकरेंना काही सवाल करणार आहेत. आपल्या प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी उत्तरे दिल्यास राजीनामा लढवून निवडणूक लढवू, असं आव्हानच कांदे यांनी आदित्य यांना दिलं आहे. त्यामुळे कांदे-आदित्य ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!