Suhas Kande । नाशिक : विस्कळीत झालेल्या पक्षाची पुन्हा मोट बांधण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा काढण्यास सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर काल भिवंडीत शिवसेनेच्या एका मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली. त्यांनी बंड केलं नाही. उठाव केला नाही. तर गद्दारी केली आहे, असं सांगतानाच शिवसेनेतून जे गेले ते गद्दारच आहेत, अशी टीका त्यांनी केली. आता आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
निष्ठा यात्रेदरम्यान, आदित्य ठाकरे यांचा आज मनमाड दौरा असणार आहे. यावेळी सुहास कांदे पाच हजार कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत. हिंदुत्वासाठी लढलो यात माझी काय चूक झाली? असा सवाल सुहास कांदे आदित्य ठाकरे यांना करणार आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरूनही ते आदित्य ठाकरेंना काही सवाल करणार आहेत. आपल्या प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी उत्तरे दिल्यास राजीनामा लढवून निवडणूक लढवू, असं आव्हानच कांदे यांनी आदित्य यांना दिलं आहे. त्यामुळे कांदे-आदित्य ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, लाज असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, असं आव्हान देतानाच हे सरकार जास्त काळ चालणार नाही. दोन लोकांचं मंत्रिमंडळ आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे लिहून घ्या, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच बुधवारी आग्रीपाडा येथे बोलताना ते म्हणाले, गद्दार हे गद्दारच असतात. त्यांचं नाव कितीही बदललं, त्यांनी कितीही गट बदलले तरी गद्दारीचा शिक्का त्यांच्या माथ्यावरून पुसला जाणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Rupali Chakankar : नाना पटोले यांच्याविरोधात कुठलीही तक्रार दाखल नाही – रुपाली चाकणकर
- Mallika Sherawat | ‘तो’ अभिनेता रोज रात्री माझा दरवाजा ठोठावायचा; मल्लिका शेरावतने केला मोठा खुलासा
- Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव; सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर राऊतांची टीका
- Presidential Election Results : द्रौपदी मुर्मूंना विरोधकांचीही मते; 17 खासदारांसोबतच 104 आमदारांचं क्रॉस व्होटिंग
- sanjay raut : “भाजपची मंडळी ‘आयत्या बिळावर नागोबा’ होण्याचा…”, OBC आरक्षणावरून शिवसेनेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

