चंद्रपूर : जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहण्यासाठी गेलेले भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार एका अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले. “तुमच्या बापाचा माल आहे का?”, असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना केला. सर्वाधिक झळ पोचलेल्या पळसगाव येथे मदत नाकारणाऱ्या वेकोली येथील अधिकाऱ्याची मुनगंटीवार यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळ म्हणून वेकोलिचा हॉल देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. दरम्यान काही तासात मदत पोहचवा अन्यथा हिशोब करतो, असा सज्जड दम सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिला. मुनगंटीवारांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत काय आहे?
या गावाच्या आसपास चुकीच्या पद्धतीने कोळसा खाणीतील मातीचे महाकाय ढिगारे उभे केल्याने गावाला पुराचा फटका बसला आहे मात्र सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांप्रती हलगर्जीपणा दाखविला होता त्यामुळे संतापलेल्या मुनगंटीवार यांनी अधिकारी वर्गाला फैलावर घेतल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गंभीर पूरपरिस्थितीत अधिकारी वर्गाची असंवेदनशीलता पुढे आल्याने सुधीर मुनगंटीवार संतापले आहे. पुराची जास्त झळ पोहचलेल्या भद्रावती तालुक्यातील पळसगाव येथे मदत नाकारणाऱ्या वेकोली येथील अधिकाऱ्याची त्यांनी कानउघाडणी केली. ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळ म्हणून वेकोलिचे सभागृह मागितले होते मात्र ते देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. काही तासात मदत पोचवा अन्यथा हिशोब करतो, हा मुनगंटीवार यांचा व्हिडिओ वायरल झाला. या गावाच्या आसपास कोळसा खाणीतील मातीचे ढिगारे चुकीच्या पद्धतीने उभे केल्याने गावाला पुराचा फटका बसला. मात्र सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांप्रती हलगर्जीपणा दाखवत महापुरात मदत नाकारली. त्यामुळे संतापलेल्या मुनगंटीवार यांनी अधिकारी वर्गाला चांगलेच फैलावर घेतले.
महत्वाच्या बातम्या :
- Suhas Kande : हिंदुत्वासाठी लढलो ही चूक झाली का?; सुहास कांदे आदित्य ठाकरेंना भेटून जाब विचारणार
- Rupali Chakankar : नाना पटोले यांच्याविरोधात कुठलीही तक्रार दाखल नाही – रुपाली चाकणकर
- Mallika Sherawat | ‘तो’ अभिनेता रोज रात्री माझा दरवाजा ठोठावायचा; मल्लिका शेरावतने केला मोठा खुलासा
- Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव; सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर राऊतांची टीका
- Presidential Election Results : द्रौपदी मुर्मूंना विरोधकांचीही मते; 17 खासदारांसोबतच 104 आमदारांचं क्रॉस व्होटिंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

