बंगळुरू : राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)चे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारतीय क्रिकेटचा स्तर वाढवण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. खेळाडू तसेच जागतिक दर्जाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांची बेंच स्ट्रेंथ बळकट करण्याबाबत त्यांनी भाष्य केले आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी गुरुवारी बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत आपले मत मांडले आहे.
लक्ष्मण यावेळी म्हणाले, “क्रिकेट हा व्यावसायिक खेळ बनला आहे आणि आजकाल ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे क्रिकेट खेळले जात आहे ते पाहता, उच्च दर्जाचे कौशल्य असलेले प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट आणि औषध तज्ञांची गरज आगामी काळात वाढणार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एनसीएमध्ये देखील असे कार्यक्रम घ्यावे लागतील जेणेकरुन भारतीय तज्ञांनाही या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करता येईल.” या बैठकीत अनेक दिग्गज आजी-माजी खेळाडूंसह, बीसीसीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.
Thank you @klrahul for addressing the candidates attending the Level-3 coach certification course at NCA. Listening to your different experiences as a player and captain will definitely help these passionate coaches to learn, improve and excel in their careers. @BCCI #NCA pic.twitter.com/LS3bdPCkIO
— VVS Laxman (@VVSLaxman281) July 21, 2022
दरम्यान, व्हीव्हीएस लक्ष्मण भारताच्या माजी क्रिकेट संघातील हे एक दमदार फलंदाज म्हणून ओळखले जातात. भारताच्या आयर्लंड दौऱ्यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळली होती. सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड भारताच्या कसोटी संघासोबत इंग्लंडमध्ये होते त्यामुळे लक्ष्मण यांनी भारताच्या बी टीमसाठी ही प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आजकाल बरेच देश क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी स्वतंत्र संघ बनवण्याच्या दिशेने पाऊलं टाकत आहेत. अशा त्यामुळेच भारतीय संघ देखील एकाच वेळी दोन वेगवेगळ्या मालिका खेळताना दिसला होता. त्यामुळे खेळाडूंच्या बेंच स्ट्रेंथबरोबरच अतिरिक्त प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ देखील असावेत, अशी भूमिका अनेक देशांकडून घेतली जात आहे. तशीच भूमिका आता भारतही घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Suhas Kande : हिंदुत्वासाठी लढलो ही चूक झाली का?; सुहास कांदे आदित्य ठाकरेंना भेटून जाब विचारणार
- Rupali Chakankar : नाना पटोले यांच्याविरोधात कुठलीही तक्रार दाखल नाही – रुपाली चाकणकर
- Mallika Sherawat | ‘तो’ अभिनेता रोज रात्री माझा दरवाजा ठोठावायचा; मल्लिका शेरावतने केला मोठा खुलासा
- Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव; सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर राऊतांची टीका
- Presidential Election Results : द्रौपदी मुर्मूंना विरोधकांचीही मते; 17 खासदारांसोबतच 104 आमदारांचं क्रॉस व्होटिंग


