Share

Russia Ukraine War: गेल्या आठवड्याभरात युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर; ‘धक्कादायक’ आकडेवारी समोर

Published On: 

नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे.

युक्रेनचे लष्कर रशियाच्या लष्कराच्या तुलनेत काहीच ताकदवान नाहीये. त्यामुळे या युद्धात युक्रेनचे जास्त नुकसान होत आहे. २४ फेब्रुवारी पासून रशियाने कोणतीही दयामाया न दाखवता युक्रेनवर सतत हल्ले केले आहेत. रशियाच्या या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना सुद्धा आपला जीव गमवावा लागत आहे. जीव वाचवायच्या  आकांताने  अनेक युक्रेनी नागरिक देशातून पलायन करायला लागले आहेत.

या बाबतच एक धक्कादायक माहिती आज समोर आली आहे. गेल्या ७ दिवसात युक्रेनमधून जवळपास १३ लाख लोकांनी पलायन केले आहे. २१ व्या शतकातील हे सर्वात मोठे पलायन ठरले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या दिवसापासून युक्रेन देशातून १३ लाख पेक्षा जास्त लोकांनी पलायन केले आहे. रशियाने आणखी हल्ले वाढवल्यास युक्रेनमधून पलायन करणाऱ्यांची संख्या ५० लक्ष लोकांपर्यंत जाऊ शकते असा देखील अंदाज आज संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेने वर्तिविला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!