Share

Russia Ukraine war:  संयुक्त राष्ट्र संघातील महत्वाच्या मतदानास भारत पुन्हा गैरहजर

Published On: 

नवी दिल्ली : युरोप खंडात सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी आघाडीमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर हे युक्रेनच्या लष्करापेक्षा कित्येक पटीने ताकदवान आहे. रशियाच्या लष्करासमोर युक्रेनच्या लष्कराचा टिकाव लागणे अवघड आहे.

सध्याच्या अणूयूगात रशिया विरुद्ध थेट लष्करी कारवाई करायला कोणताही देश धजावत नाहीये. मात्र रशियाची आंतरराष्ट्रीय पातळीवर जमेल त्या प्रकारे कोंडी करायचा प्रयत्न जगातील बलाढ्य देश करत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत, संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत रशियाची कश्या प्रकारे कोंडी करता येईल याचा प्रयत्न पाश्चिमात्य देश करत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत, सुरक्षा परिषदेत आणि मानवाधिकार परिषदेत भारताने मात्र मतदानाच्या दिवशी गैरहजर राहण्यास पसंत केले. असाच काहीसा प्रकार आज संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत पुन्हा मतदान करायच्या वेळेज घडला.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याची आंतरराष्ट्रीय समिती द्वारा चौकशी करण्यात यावी याकरता संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत मतदान घेण्यात आले. या मतदानाच्या वेळेज भारत आज पुन्हा गैरहजर राहिला. संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत रशिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात यावी याकरता आज मतदान घेण्यात आले. या मतदानाच्या वेळेज आंतरराष्ट्रीय चौकशी समिती नेमायच्या बाजूने ३२ मत पडली. तर दोन देशांनी आपला नकाराधिकार वापरला. भारतासह १३ देश हे संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार सभेत मतदान करताना गैरहजर राहिले.

महत्वाच्या बातम्या :      

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!