नागपूर: उत्तर नागपुरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयात गेल्या रविवारी तोडफोड करण्यात आली. युवक काँग्रेसचा कार्यकर्ता बाबू खान व इतर जणांनी ही तोडफोड केल्याची तक्रार विक्की कुकरेजा यांनी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. आता या प्रकरणात नवा व्हिडीओ समोर आला आहे.
काँग्रेसच्या अखिल भारतीय एससी सेलचे समन्वयक अनिल नगरारे यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा व्हिडीओ जारी केला.अवघ्या काही सेकंदाच्या या मोबाईल व्हिडीओ मध्ये नगरसेवक विक्की कुकरेजा हे बाबू खान यांना मारहाण करताना दिसून येत आहेत. कुकरेजा यांच्यासह नगरसेवक महेंद्र धनविजय आणि भाजप उत्तर नागपूर अध्यक्ष संजय चौधरी हे देखील या व्हिडीओमध्ये असल्याचे नगरारे यांनी सांगितले.
विक्की कुकरेजा यांच्यावर पोलिसांनी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र चार दिवस उलटूनही विक्की कुकरेजा यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही व अखेर ३ मार्चला सत्र न्यायालयातून कुकरेजा यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला. काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेतल्या नंतर नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांनी म्हणलं की उशिरा का होईना काँग्रेस ने मान्य केला की त्या लोकांनी माझा ऑफिसमध्ये तोडफोड केली आणि आम्ही त्यांना थांबवल आणि त्यांना कार्यलायच्या बाहेर काढलं.
महत्वाच्या बातम्या:
राजकारणाविषयी बोलताना गडकरी म्हणाले, ‘माझ्याशिवाय कुणी येऊच नये…’
संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; झालेल्या चर्चेतून दिला सूचक इशारा
भाजपने पुणेकरांच्या पैशाला चुना लावला ; रूपाली पाटील ठोंबरे आक्रमक
PAK vs AUS: जगातील नंबर वन गोलंदाजाला घायाळ करणारा ‘तो’ पाकिस्तानी फलंदाज कोण?
“माझ आयुष्य ५ मिनिटांसाठी…”; सनीनं ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

