मुंबई : आजच झुंड हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर झुंड सिनेमाची खूप चर्चा सुरू आहे. अनेक दिग्गज कलाकारांसाठी या सिनेमाच स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. नागराजच्या या सिनेमाबद्दल अमीर खान, साऊथ सुपरस्टार धनुष यांनी भरभरून कौतुक केले. आता हा सिनेमा प्रदर्शित होत असलेल्या पार्श्वभूमीवर अभिनेता जितेंद्र जोशी याने देखील इन्स्टाग्रामवर केलेल्या लाईव सेशनमध्ये हजेरी लावली होती.
जितेंद्र जोशी याने इन्स्टाग्रामवर केलेल्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं की, तीन दिवसांपूर्वी मी हा सिनेमा पाहिला. पण अजूनही या सिनेमातील प्रत्येक फ्रेम, प्रत्येक सीन, प्रत्येक संवाद मनात घर करून बसला आहे. डोळ्यासमोरून हा सिनेमा हटतच नाही. या सिनेमातून समाजाला पुन्हा एकदा त्याचा खरा चेहरा दाखण्याचं काम नागराज यांनी केलं आहे. जितेंद्रच्याच शब्दात सांगायचं तर ‘अजिबात न लपवता, मेकअप नसलेला चेहरा. म्हणजे झुंड’ अमिताभ बच्चन असा बच्चन मी पहिलाच नाही. सगळी नवीन पोर तर कामालच आहेत. लई डेंजर पिक्चर बनवलाय. म्हणून मी लाइव करतोय, अस जितेंद्र जोशी म्हणाला.
सिनेमात बच्चनगिरी दिसत नाही.
जितेंद्र जोशी याने केलेल्या इन्स्टाग्रामवरील लाईव्ह सेशनमध्ये नागराज मंजुळे देखील सहभागी झाले होते . नागराज मंजुळे यांच्या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन काम करणार ही जेव्हा बातमी आली तेव्हा सगळ्यांना आनंद झाला होता . याबाबत जितेंद्रने त्याच्या लाईव्ह सेशनमध्ये यावर भाष्य केलं . तो म्हणाला , महानायक अमिताभ बच्चन यांना तू सिनेमात घेतलं . परंतु तुझ्या सिनेमात बच्चन साहेबांचं एक वेगळंच रूप सर्वांना दिसलं आहे .आपल्याला कुणालाच त्यांना सर्वसामान्य रूपात बघण्याची सवय नाही . त्यांना अशा सर्वसामान्य रूपात दाखवण्याचं धैर्य तू केलेस . नागराज तुझ्या या सिनेमात अमिताभ सरांची ‘ बच्चनगिरी ‘ कुठेच दिसली नाही . आपल्या सर्वांना एक वेगळे अमिताभ बच्चन दिसले . हे केवळ तूच करू शकतोस . ‘ जितेंद्र पुढे म्हणाला की , बच्चन साहेबांना आपण महानायक म्हणतो . त्यांना सर्वसामान्य माणूस दाखवलं आहेस तू . महानायक आणि महामानव तू एका फ्रेममध्ये आणलेस . हे तूच करू शकतोस नागराज ”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

