Share

MNS : अमित ठाकरेंना शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार; पहा राज ठाकरे काय म्हणाले?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस अनेक मोठे गौप्यस्फोट होतायत. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाला कोणाला स्थान मिळणार याबाबत मोठ्या चर्चा सुरु आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचीही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना धक्का देण्याासठी भाजप ही खेळी करण्याची शक्यता आहे. भाजपकडून मनसेला ही ऑफर दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमान पत्रात छापून आली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी ही ऑफर धुडकावल्याचेही वृत्त आहे. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत माहिती देताना असं काही नाही, असे सांगून यावर पडदा टाकला आहे. असं काहीही होणार नाही, असे राज म्हणाले. तशी माहिती त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे.

दरम्यान, यानंतर याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले कि, अमित ठाकरे मंत्री होणार असल्याची बातमी चुकीची आहे. अमित ठाकरे मंत्री होणार नाहीत. या पूर्ण प्रक्रियेत मनसेचा कुठलाही सहभाग नाही. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी याबाबत झी २४ तासला प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!