ठाणे: गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पुष्प अर्पण केले. त्यानंतर ते ठाण्यातील आनंद आश्रम येथे दाखल झाले. आनंद आश्रमात पोहचल्यानंतर त्यांनी पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन केले. त्यांनतर त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची सर्वसामान्यांना न्याय देण्याची शिकवण होती. त्यामुळे राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आमचं युतीचं सरकार करेल”, असे ते यावेळी म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे मी जरी मुख्यमंत्री असलो तरी, एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखं काम करेन, राज्याचा सेवक म्हणून काम करेन. त्यामुळे येत्या काळात सर्वसामान्य माणसाच्या जीवनात घडलेला बदल, नक्कीच पाहायला मिळेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

