🕒 1 min read
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (मंगळवार) मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी (राष्ट्रपती निवडणूक) पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी किंवा अन्य कोणीही आपल्यावर कोणताही दबाव टाकला नसल्याचेही ते म्हणाले. शिवसेना खासदारांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावरच मनसे प्रवक्ते गजाजन काळे (Gajajan Kale) यांनी व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंवर दडपण असल्याचे म्हटले आहे.
दडपण …???????? pic.twitter.com/ipQRA9S8Iw
— Gajanan Kale (@MeGajananKale) July 12, 2022
द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना खासदारांचे समर्थन असल्याने उद्धव ठाकरेंवर दडपण आल्याचे चित्र अधोरेखित करणारे व्यंगचित्र गजनाज काळे यांनी पोस्ट केले आहे. त्याला ‘दडपण’ असे कॅप्शन देऊन मनसेनी शिवसेनेला डिवचले आहे.
कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रिया-
राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत. शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही. असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया-
“आजपर्यंत एकही आदिवसी महिला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसली नाही. हा पाठिंबा कोणा एका व्यक्तीचा नसून, महाराष्ट्राच्या जनमताचं प्रतिक आहे. बाळासाहेब ठाकरे प्रसंगी एनडीएच्या बाहेर जाऊन मतदान करायचे. उद्धव ठाकरे यांनी आज तो गित्ता गिरवला आहे, याचा मला अभिमान आहे.”, असे शिंदे गटातील दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Deepak Kesarkar | शरद पवारांनी शिवसेना फोडली!, नारायण राणे, भुजबळांना मदत केली ; केसरकरांचा खळबळजनक दावा
- Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंचा एनडीएच्या मुर्मू यांना पाठिंबा; शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
- Vasai Landslide : वसईत दरड कोसळून एकाचा मृत्यू; चार जण अडकले
- Richa Chadha । “अभी तो हमें और जलील होना है”; रिचा चढ्ढाच्या पोस्टवर कॉमेंट्सची बरसात
- Pune Heavy Rain : घरांमध्ये शिरले ड्रेनेजचे पाणी; मुसळधार पावसाने पुणेकर हैराण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
