Share

Amit Thackeray : आरे मेट्रो कारशेडबाबतच्या निर्णयावर अमित ठाकरे म्हणाले, “माणूस नावाचा प्राणी शिल्लकच…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या महाराष्ट्रात स्थापन झालेले नवे सरकार अनपेक्षित असे निर्णय घेत आहे. मागील काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आरे मेट्रो कारशेडचा मुद्दा प्रचंड चर्चेत राहिला होता. आता एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर पुन्हा एकदा या मुद्द्याला खतपाणी मिळाली आहे. आरे येथे मेट्रो कार शेड उभारण्याच्या निर्णयाला काही वर्षांपूर्वी प्रचंड विरोध झाला होता. यानंतर मागील उद्धव ठाकरे सरकारने आरे येथे मेट्रो कार शेड बनवण्याचा निर्णय रद्द केला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या सरकारने उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आरे येथेच मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा या सरकारच्या निर्णयाला विरोध होत असलेला पाहायला मिळत आहे. नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेचे नेते व माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचे एक विचार झाल्याचे दिसत आहे.

माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेळोवेळी आरेमध्ये कारशेळ उभारण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबतीत त्यांनी नेहमीच पर्यावरणवादी गटाची बाजू घेतली आहे. आता या लढाईत आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेचे नेते अमित ठाकरे देखील उतरले आहेत. अमित ठाकरे यांनी नव्या सरकारने घेतलेल्या त्यांच्या आरे येथे कारशेड उभारण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा असे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिले आहे.

अमित ठाकरे यांनी फेसबुकवर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत. पुढे त्यांनी “आरेमध्ये कार शेड होऊ नये म्हणून शेकडो तरूण-तरूणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होत…” असेही अमित ठाकरे म्हणाले आहेत.

याबाबत पुढे अमित ठाकरे म्हणाले आहेत की, “आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्धवस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहाणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं.”

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर नव्याने सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे येथे मेट्रो कारशेड उभारण्याच्या त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती देखील अमित ठाकरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!