Share

Sanjay Raut : “मातोश्रीवर याव्यात म्हणून…”, संजय राऊतांनी केले मुर्मू यांना पाठींबा देण्यामागील कारण स्पष्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दर्शविला आहे. त्या आज मुंबईत येणार आहेत. त्या भाजप आणि शिंदे गटाच्या आमदार, खासदारांशी संवाद साधून त्यांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहे. शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने मुर्मू या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का?  याबाबत चर्चा रंगत आहेत. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

“द्रौपदी मुर्मू यांनी शिवसेनेत याव म्हणून हा निर्णय घेतला नाही. ही आमची भावना आहे. आदिवासी समाजाबाबतचा आदर आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला आहे. मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राजकीय नाही. शिवसेनेत अनेक आदिवासी कार्यकर्ते आहेत. आदिवासी कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने हा निर्णय घेतला. यापूर्वी प्रतिभा पाटील यांना महाराष्ट्राची कन्या म्हणून पाठिंबा दिला. प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. शिवसेनेची ही परंपरा आहे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान मातोश्रीवर याव्यात म्हणून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. द्रौपदी मुर्मू या मागास भागातून आल्या असून त्या राष्ट्रपती व्हाव्यात ही राष्ट्राची भावना आहे. त्यामुळे निवडणुका आणि राजकीय फायद्या तोट्याचं गणित आम्ही पाहिलं नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!