Share

Gajanan Kale | “नवाब सेनेच्या पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना प्रेमपत्र” ; गजानन काळेंचे खोचक ट्विट

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होऊन ४० आमदारांनी बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. या फुटीमध्येही १५ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भावूक पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले आहे. मात्र मनसेने या पत्राची थट्टा उडवली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी या पत्राची खल्ली उडवली आहे.

“जो बूँद से गयी वो ‘पत्र’से नहीं आती. खंजीर, कोथळा, लाकूडतोड्याची गोष्ट, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्र यानंतर नवाब सेनेच्या पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना प्रेमपत्र”, असे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे.

गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत शिवसेनेला नवाब सेना म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेवर टीका होत आहे. भाजप, मनसे यात अग्रेसर आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी झाल्याचे म्हटले होते.

उद्धव ठाकरेंनी पत्रात काय म्हटले?

जय महाराष्ट्र! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय आहे.

शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या, प्रलोभनांना बळी न पडता आपण शिवसेनेसोबत राहिलात आपल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळाले. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, असे पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!