Share

Sanjay Raut : राज्यात 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू, कुठे आहेत राज्यपाल?; संजय राऊत यांचा सवाल

Published On: 

Sanjay Raut । मुंबई : शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं वेगळी वाट पकडल्यानं शिवसेनेत गळतीच सत्र सुरूच आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला. शिवसेनेत आता १५ आमदार उरले आहेत. असं असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मात्र बंडखोरांवर सडकून टीका करत आहेत. मात्र आता राऊतांच्या निशाण्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आले आहेत.

सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. तर दुसरीकडे कॉलराचं थैमान सुरु आहे. पावसामुळे राज्यभरात 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल आम्हाला खूप सल्ला द्यायचे. आता त्यांची गरज आहे. आता त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, याआधी शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. राज्यपालांना अधिक कष्टदायी काम असल्यामुळे त्यांनी वर्षभर अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला नव्हता. पण हे सरकार आल्यानंतर 48 तासांत तोच निर्णय घेण्यात आला. पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले, पण हे राज्यपाल… अशा शब्दात पवारांनी राज्यपालांवर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!