Share

Urfi Javed | उर्फी जावेदचा ड्रेस पाहून तुम्हीही व्हाल ‘घायाळ’; नेटकऱ्यांच्या मजेदार कॉमेंट्स

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क: बिग बॉस स्टार उर्फी जावेद ही अशी अभिनेत्री आहे जी अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. ती कधी प्लास्टिकपासून बनवलेल्या ड्रेसमध्ये, तर कधी फुलांच्या, कधी कॉटन कँडीमध्ये तर कधी पोत्याच्या कापडापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये दिसली एवढं नाही तर तिने चक्क वर्तमानपत्रापासून बनलेला ड्रेसही परिधान केला होता. तिच्या याच अजब फॅशन मुळे ती नेहमीच ट्रोल होत असते. मात्र या ट्रोलिंगचा तिच्यावर काहीही फरक पडत नाही. तिला कितीही ट्रोल केले तरी ती कपड्यांसोबत विविध प्रयोग करतच असते. नुकताच तिने असाच एक नवीन प्रयोग केला आहे. ज्यामध्ये तिने चक्क ब्लेडपासून बनलेला ड्रेस परिधान केला आहे. अलीकडेच उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तिने शेकडो ब्लेडपासून बनवलेला ड्रेस परिधान केला आहे. उर्फीचा हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्फीने लिहिले की, “मी हा ड्रेस इन्ट्रोव्हर्ड लोकांसाठी बनवला आहे. रेझर कट! हा ड्रेस रेझरपासून बनवला आहे. यासाठी मी माझ्या टीमचे जेवढे आभार मानेल तेवढे कमीच आहेत. कारण त्यांनी मला माझ्या या अजब कल्पनेत खूप मदत केली”.

https://www.instagram.com/reel/Cf5vE0qFEeJ/?utm_source=ig_web_copy_link

उर्फीच्या या व्हिडिओवर नेटकाऱ्यानी भन्नाट कॉमेंट्स केल्या आहेत. कोणी लिहिले कि, “तू कोणाला मारायला निघाली आहेस का?” तर कोणीतरी लिहिले की “सावधगिरीने चाल हा”, तर कोणी म्हणाले, “कोणाचा जीव घेणार आहेस तू?”. अश्याच मजेदार कॉमेंट्सने उर्फीचे कॉमेंट सेक्शन भरून गेले आहे.

उर्फीच्या ड्रेसने सर्वांनाच थक्क करण्याची ही पहिलीच वेळ नाही. उर्फी सांगते की ती स्वतःचे कपडे डिझाइन करते. ती नेहमीच असे ड्रेस घालून बाहेर पडते, जे सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडील असतात. काही दिवसांपूर्वी तिने अंगावर निळ्या रंगाची तार गुंडाळून ड्रेस बनवला होता. खरे तर अश्या कपड्यांवेळा उर्फीला अनेक वेळा शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते पण तरीही ती असे कपडे घालणे सोडत नाही. एकदा तर उर्फीने टॉप ऐवजी चेन घातली, ज्यामुळे त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!