🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर बुधवारी विवाहबद्ध झाला. त्याने त्याची मैत्रिण जया भारद्वाज हिच्याशी लग्न केले आहे. दोघांनी आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. दिपकची बहीण मालती चहरनेही त्याला लग्नाच्या शुभेच्छा देत ट्विट केले आहे. अभिनंदनासोबतच मालतीने तिचा भाऊ दीपकला हनिमूनला जाण्यापूर्वी एक सल्लाही दिला आहे. मालतीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करताना लिहिले की, आता मुलगी आमची आहे, दोघांनाही वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. विश्वचषक जवळ आल्याने हनिमूनच्या वेळी तुझ्या पाठीच्या दुखपतीची काळजी घे.
आयपीएलच्या मागील सीझनमधील शेवटच्या सामन्यादरम्यान चहरने त्याची गर्लफ्रेंड जया हिला स्टेडियममध्येच प्रपोज केले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. मात्र, त्या सामन्यात चहरची कामगिरी चांगली नव्हती आणि त्याने ४ षटकात ४८ धावा दिल्या आणि फक्त १ बळी घेतला होता. पंजाबविरुद्धच्या या सामन्यात चेन्नईचा पंजाबने ६ गडी राखून पराभव केला होता.
Ab ladki hui humari….Wish you guys a very happy married life???? @deepak_chahar9 please take care of your back during your honeymoon..we have World Cup ahead ????#family #brother #marriage #siblings pic.twitter.com/Hm2unculO7
— Malti Chahar???????? (@ChaharMalti) June 3, 2022
दीपक चहर आयपीएल २०२२ मध्ये खेळू शकला नाही
दीपक चहरला लिलावादरम्यान चेन्नई सुपर किंग्जने तब्बल १४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण पाठीच्या दुखापतीमुळे तो एकही सामना न खेळता संपूर्ण हंगामातून बाहेर पडला. त्याच्या अनुपस्थितीचा फटका चेन्नईला सहन करावा लागला आणि संपूर्ण हंगामात केवळ ४ विजय नोंदवून संघ आयपीएलमधून बाहेर पडला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
