🕒 1 min read
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी शरद पवार यांनी नितीन गडकरी यांचं वसंतदादा इन्स्टिट्यूटमधील आयोजित कार्यक्रमात कौतुक केले.
“केंद्र सरकारमध्ये ऊसाचा, साखरेचा किंवा कुठलाही प्रश्न उभा राहिला तर मदतीसाठी नेहमी पुढे येणारे एकच मंत्री आहेत, ते म्हणजे नितीन गडकरी” असे कौतुक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन गडकरी यांचे केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
“ऊसतोडीचे नियोजन आताच करावे लागेल. साखरेची निर्यात चांगली झाली आहे. यावर्षी सारखेचे उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार 90 लाख टनापेक्षा जास्त साखरेची निर्यात झाली आहे. या हंगामात 64 लाख टन साखर निर्यातीसाठी करार झाले आहेत, भारताने यावर्षी जगातील 121 देशात साखरेची निर्यात केली, हे पहिल्यांदा झाले”, असे शरद पवार म्हणाले.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “आज आपल्या शेतकऱ्यांकडे दोन पैसे मिळतील, असे खात्रीशीर पीक नाही. अपेक्षित ऊस उत्पादन यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. ऊस विकास योजना सातत्याने राबविली जात नाही. त्यामुळे त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होत आहे. ऊस विकास योजना राबवली तर उत्पादनात भरीव वाढ होईल”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
