Share

भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूचा अर्जुन तेंडुलकरला सल्ला; म्हणाले, “५० टक्केतरी वडीलांसारखे…”

Published On: 

मुंबई : जगातील महान फलंदाजांपैकी एक सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील क्रिकेटपटू आहे. क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी तो सतत मेहनत करत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला त्यांच्या संघाशी जोडले होते. परंतु यंदाच्या मोसमात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या मुद्द्यावरून अर्जुन तेंडुलकरवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी आपले मत मांडले आहे.

कपिल देव यांनी सर्व टीकाकारांना फटकारले असून अर्जुनला प्रश्न विचारणारे आम्ही कोण आहोत, असे म्हटले आहे. कपिल देव म्हणाले, “प्रत्येकजण त्याच्याबद्दल का बोलत आहे. का तर तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. त्याला त्याचे क्रिकेट खेळू द्या आणि त्याची सचिनशी तुलना करू नका. त्याच्यासोबत तेंडुलकरचे नाव असणे देखील त्याच्यासाठी हानिकारक आहे. डॉन ब्रॅडमनचा मुलगा होता मात्र त्याने त्याचे नाव बदलले कारण तो दबाव हाताळू शकला नाही. त्याने आपले आडनाव बदलले कारण प्रत्येकाला तो त्याच्या वडिलांसारखा दिसावा अशी अपेक्षा होती.”

“अर्जुनवर दबाव आणण्याचे काही कारण नाही. एक तरुण मुलगा आहे. त्याच्यासोबत त्याचे वडील महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर असताना त्याच्याबद्दल काहीही बोलणारे आपण कोण आहोत. तरीही, मला त्याला एकच सांगायचे आहे की, जा आणि स्वतः चांगलं बनव आणि क्रिकेटचा आनंद घे. कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज नाही. जर तुम्ही तुमच्या वडिलांसारखे ५० टक्के बनू शकत असाल तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. जेव्हा तेंडुलकरचे नाव येते तेव्हा आमच्या आशा उंचावतात कारण सचिन हे एक महान व्यक्तिमत्व आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!