दिल्ली : गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी 30 राऊंड गोळीबार करण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या लकीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान लॉरेन्स बिश्नोईने गुन्हा कबुल केला आहे. तो म्हणाला माझ्याच टोळीच्या लोकांनी मुसेवाला याची हत्या केली आहे.
लॉरेन्स बिश्नोई हा तिहार जेलमध्ये आहे. पोलिसांच्या चौकशी दरम्यान तो म्हणाला, यावेळी हे काम मी केलेलं नाही. कारण मी तुरुंगामध्ये आहे आणि मी फोनचा सुद्धा वापर करत नाही. पण मी हे मान्य करतो की सिद्धू मुसेवालाची हत्या माझ्याच टोळीतील लोकांनी केली आहे. मला त्याच्या मृत्यूची माहिती तिहार तुरुंगातील टिव्हीवर बातम्यांमध्ये पाहायला मिळाली.
नेमका कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. २०१८ मध्ये जेव्हा त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती तेव्हापासून हा चर्चेत आलेला आहे. तो पंजाबच्या अबोहर भागात राहतो. लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना निवडणुकीला उभा राहिला होता. पण निवडणुकीत पराभव झाल्यावर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याची गुन्हेगारी क्षेत्रात सुरवात झाली.
महत्वाच्या बातम्या :


