Share

कोरोना वाढतोय…! राज्यात मास्क सक्ती नाही पण… ; राजेश टोपेंचे मोठे विधान

Published On: 

पुणे : महाराष्ट्रातील कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. देशात आढळलेल्या एकूण कोविड प्रकरणांपैकी 60 ते 70 टक्के प्रकरणे महाराष्ट्र आणि मुंबईतील आहेत. येथे सरकारने चिंता व्यक्त करत लोकांना इशारा दिला आहे आणि मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. आठवडाभरात महाराष्ट्रातील मुंबईसह सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी केंद्राकडून एक संदेशही जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात पुन्हा मास्क सक्ती झाल्याच्या चर्चेवर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात मास्क सक्ती नाही पण मास्क वापरणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

“मुंबई, पुणे, पालघर, ठाणे आणि रायगडचा काही भागात थोडीफार कोरोना संख्या वाढत आहे. त्यामुळे देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याला पत्र पाठवलं आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्या बाबतीत परवा टास्क फोर्सच्या बैठकीत स्पष्टपणे ठरलं की जिथे गर्दीची ठिकाण आहे, तिथे मास्क वापरण्याचं आवाहन करावं. ते सक्तीचं नाही”, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.

राज्याचे अतिरिक्त सचिव (आरोग्य) डॉ प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकार्‍यांना पत्र लिहून रेल्वे, बस, सिनेमा हॉल, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा अशा बंद सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यास सांगितले आहे. वाढती प्रकरणे आणि केंद्राच्या पत्रानंतर महाराष्ट्र सरकार कारवाईत आले आहे.

सरकार सतर्क

कोरोनाबाबत महाराष्ट्र सरकार जागरूक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलावून लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच मास्क वापरण्याचा आणि ताप किंवा घसा खवखवणे यासारखी इतर लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. राज्यात कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची चौथी लाट येऊ नये, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!