सातारा : येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असं वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत व्यक्त केलं आहे. धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी खटाव तालूक्यातील डिस्कळ येथे आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रातीक्रिया दिली आहे.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. गजानन काळे म्हणाले, “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, धनंजय मुंडे संजय राऊत व त्यांच्या सेनेने काय धूनी भांडी करायची का, मग तुमची? हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे आणि तो सहन केला जाणार नाही. खंजीर, कोथळा, वाघनखे, मर्द, मावळा सह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा अर्थात दै.सामना नव्हे टोमणा”.
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल-धनंजय मुंडे
संजय राऊत व त्यांच्या सेनेने काय धूनी भांडी करायची का मग तुमची ?
हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे.आणि तो सहन केला जाणार नाही.
खंजीर,कोथळा,वाघनखे,मर्द,मावळा सह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा.
अर्थात दै.सामना नव्हे टोमणा.— Gajanan Kale (@MeGajananKale) June 4, 2022
काय म्हणाले होते धनंजय मुंडे ?
पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रीपदाचे खाते हे माझ्याकडे असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल. “कितीही मजबूत सरकार असलं तरी विरोधी पक्षनेता असताना त्या सरकारला गदागदा हालवण्याचं काम मी केलं. आज शब्द देतो येणाऱ्या काळात जर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपद कोणाला द्यायचा उद्या जर प्रस्ताव आला मुख्यमंत्री कोणीही असतील. आपलेच असतील ते पद आपल्याशिवाय कोणाला देणार नाहीत येवढी प्रतिष्ठा या मंत्रीपदाच्या कामांमुळे कमावली असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

