Share

औरंगाबाद महानगपालिका निवडणूक लांबणीचे तर संकेत नाही ना?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुक पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याचे संकेत दिसत आहेत. विधीमंडळ अधिवेशनात महाराष्ट्र महापालिका कायदा, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी कायदा १९६५ मध्ये सुधारणा करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील सर्व मुदत संपलेल्या महापालिका, नगरपालिकांमधील प्रशासकांचा कार्यकाळ आता बेमुदत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासक असलेल्या औरंगाबाद मनपाची निवडणुकही पुढे ढकल्यानेच चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, एप्रिल २०२०मध्ये औरंगाबाद महापालिकेची मुदत संपली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे या ठिकाणी प्रशासक म्हणून मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली. औरंगाबाद महापालिकेबरोबरच नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर आठ महापालिकांची पोटनिवडणूक देखील होणार आहे. निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या या महापालिकांवर राज्य शासनाने सुरुवातीला सहा महिन्यांसाठी प्रशासकांची नियुक्ती केली. त्यानुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रशासकांची नियुक्ती होती. दरम्यान, त्यानंतर पुन्हा प्रशासकांच्या नियुक्तीला सहा महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत महापालिकेवर प्रशासक नियुक्त असतील आणि एप्रिलनंतर महापालिकेची निवडणूक होईल, अशी शक्यता होती.

दरम्यान, राज्यातील सर्व मुदत संपलेल्या महापालिका, नगरपालिकांमधील प्रशासकांचा कार्यकाळ आता बेमुदत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेबरोबरच, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली महापालिकेचीही निवडणूक पुढे जाण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

२०१५ च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!