Share

कांचनवाडी येथील पाण्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प; पहिल्या टप्प्यात २ एलएमडी पाण्यावर प्रकल्प

Published On: 

औरंगाबाद : शहरात पाण्याची समस्या हा नेहमीचाच भाग आहे. अनेकदा उन्हाळ्यात शहराला भिषण पाणीटंचाई सहन करावी लागते. जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतरही पाण्याचे नियोजन निट होत नसल्याने शहराचा पाणी प्रश्न हा सुटत नाही. यावर मनपाने काही प्रमाणात पाण्याची समस्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना राबवण्याचे ठरवले आहे.

याच उपाययोजनेचा भाग म्हणून मनपाने कांचनवाडी येथील प्लँटमधील नाल्यात सोडण्यात येत असलेल्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी शुद्ध करण्यासाठी जाहिरात दिली आहे. कांचनवाडी येथील प्लँटमध्ये सध्या ६० ते ६१ एलएमडी पाण्यावर प्रक्रिया होत आसते. हे प्रक्रिया केलेल पाणी नाल्यात सोडले जात असते. नाल्यात सोडले जात असल्याने हे पाणी वाया जाते. याच पाण्यावर आणखी प्रक्रिया करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. औद्योगीक कंपन्यांनी प्रक्रिया केलेले पाणी प्राधान्याने वापरावे यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.

मात्र प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी शुद्ध नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेने जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात दोन एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला जाणार आहे आणि त्यासाठी पीएमसीमार्फत प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. पीएमसीच्या नियुक्तीसाठीच्या प्रस्तावाला मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!