Share

मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपायुक्त वीणा सुपेकर यांच्याकडे मराठवाड्यातील ऑक्सिजन टँकबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे.

औरंगाबादसह मरावाड्यात ज्या ठिकाणी ऑक्सिजन टँक बसवण्यात येत आहेत, त्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय आणि मेल्ट्रॉनमध्ये ऑक्सिजन टँकची प्रक्रिया तातडीने करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात घाटीमध्ये सर्वाधिक ४६ केएलचे ऑक्सिजन टँक बसवण्यात आले आहेत. यामध्ये सुपरस्पेशालिटी विभाग तसेच मेडिसिन विभागात हे ऑक्सिजन टँक आहेत.

राज्यात सध्या रायगड, चाकण, नागपूर बुटीबोरी या ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. मात्र, हा ऑक्सिजन स्थानिक ठिकाणीच मिळावा म्हणून सर्वच जिल्ह्यांत ऑक्सिजन टँकची तयारी करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्हा रुग्णलायात १३ केएलचा तर मेल्ट्रॉनमध्ये २० केएलचा ऑक्सिजन टँकचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!