औरंगाबाद : रेल्वेत टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणाने तिघांना १६ लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. अनिकेत कैलास कोकाटे असे या २३ वर्षीय आरोपीचे नाव अशून अहमदनगरमधील देसवंडी येथील रहिवासी आहे. अनिकेतने पुणे-औरंगाबाद प्रवासात ओळख झाल्यानंतर रेल्वेत टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या दोघांना आणि एका शाळेतील शिपायाची १६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्याच्यावर औरंगाबाद येथील सिडको पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
औरंगाबादेतील एन-११ मधील नवजीवन कॉलनीत राहणारे भरत खेडकर हे शाळेत शिपाई आहे. दोन वर्षांपूर्वी जुलै २०१८ मध्ये पुणे-औरंगाबाद प्रवासात त्यांची अनिकेतसोबत ओळख झाली. यावेळी त्याने सरकारी विभागात आपल्या चांगल्या ओळखी असल्याचे सांगूण खेडकर यांचा संपर्क क्रमांक घेतला. त्यानंतर पंधरा दिवसांनी त्याने खेडकर यांना कॉल करून रेल्वे टीसीच्या जागा निघाल्याची माहिती दिली आणी तुम्हाला नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवले.
भरत खेडकर यांनी याविषयी नातेवाईक विशाल तुकाराम ताठे आणि सुनील विठ्ठल नागरे यांना माहिती दिली आणि त्यांना सोबत घेऊन औरंगाबादमध्ये अनिकेतची भेट घेतली. तिथे तिघांना विश्वासात घेऊन त्याने प्रत्येकी दहा लाख रुपयांची मागणी केली. विशाल आणि सुनीलने परिस्थिती नसल्याचे सांगितल्यामुळे आठ लाखांत व्यवहार ठरला. तिघांनी त्याला पहिला टप्पा म्हणून साडेनऊ लाख रुपये दिले. पैसे मिळताच कोकाटेने विशालला फोन करून विमानाने दिल्लीला येण्यास संगितले. १६ सप्टेंबर २०१९ रोजी विशाल व त्याचे भाऊजी गोविंद इप्पर दिल्लीत पोहोचले. कोकाटेने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले. त्यानंतर चार दिवसांत नियुक्तिपत्र दिले. शहरात परतताच कोकाटेने उर्वरित पैशांची मागणी सुरू केली. पुन्हा दोन लाख दुसऱ्या टप्प्यात घेऊन त्याने सुनीलला देखील दिल्लीत बोलावले. त्याची देखील रेल्वे भवनात वैद्यकीय तपासणी करून नियुक्तिपत्र दिले.
दरम्यान, अनिकेतने राज्यात अनेक तरुण, तरुणींची फसवणूक केली आहे. या प्रकरणात अडकू नये म्हणून तो रोख रक्कम घेतो तसेच काहीतरी कारण सांगून दिलेले नियुक्तिपत्र परत घेतो. त्यामुळे फसवणूक झालेल्या मुलांकडे काहीच पुरावे राहत नव्हते. मात्र, या वेळी ऑनलाइन व्यवहार आणि एक नियुक्तिपत्र पोलिसांच्या हाती लागल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार असून लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यासाठी खुशखबर या दोन नवीन रेल्वे गाड्या सुरु होणार
- कोरानाच्या काळात पोलिसांची काळजी घेण्यात सरकार अपयशी
- ‘न्याय मागण्यासाठी गेलो तर पोलिसांनी कुत्र्यासारखे हाकलून लावले’
- विद्यार्थी सुविधा केंद्राची परीक्षा विभागात स्थापना
- डाळी शंभरीत गेल्याने महिलांचे आर्थिक गणित कोल


