औरंगाबाद : शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई पाणीटंचाई निवारणासाठी दोन दिवसांत आढावा बैठक घेणार आहे. पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरिंसिगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन दिवसांत संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
औरंगाबाद शहरात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. यावर मनपा आणि राज्य स्तरावरून काय नियोजन करण्यात आले, असा प्रश्न पालकमंत्री सुभाष देसाई यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर नियमित आणि विना व्यत्यय मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात दोन दिवसांत संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.
शहराचा केंद्र शासनाच्या इझ आॅफ लाइन आणि गुणवत्तापूर्ण राहणीमानाच्या सर्वेक्षणात १३ वा क्रमांक लागला. यासंदर्भात शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्र्यांनी अभासी पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन पांडेय आणि पत्रकारांशी संवाद साधला. नवीन योजना पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले
महत्त्वाच्या बातम्या
- टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाचा तिघांना १६ लाखांचा गंडा
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू
- मराठवाड्यासाठी खुशखबर या दोन नवीन रेल्वे गाड्या सुरु होणार
- विद्यार्थी सुविधा केंद्राची परीक्षा विभागात स्थापना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
