सचिन तेंडुलकरने केले भारतीय क्रिकेट बद्दल एक मोठे वक्तव्य …

मुंबई: भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकर याने भारतीय क्रिकेट बद्दल एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. उद्या दिनांक ६ फेब्रुवारी पासून वेस्टइंडीज संघ भारतात मर्यादित षटकांची मालिका खेळायला येणार आहे. या आगामी वेस्टइंडीजच्या भारत दौऱ्यात ३ एकदिवसीय तसेच ३ टी-२० सामने खेळले जाणार आहेत. एकदिवीय सामने अहमदाबाद येथील श्री. नरेंद्र मोदी या मैदानावर होणार आहेत. तर टी-२० सामने कोलकत्ता येथील ईडन गार्डन वर होणार आहेत. वेस्टइंडीज विरुद्ध असणारा पहिला एकदिवसीय सामना भारताचा एकदिवसीय इतिहासातील १००० वा एकदिवसीय सामना ठरणार आहे.

याच १००० व्या एकदिवसीय सामन्याचे औचित्य साधून भारतीय क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने एक खास वक्तव्य केले आहे. १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेपासून  भारतीय क्रिकेट मध्ये एक प्रकारचे मोठे  स्थित्यंतर घडल्याचे सचिन तेंडुलकर याने म्हंटले आहे. भारताच्या १००० व्या एकदिवसीय सामन्याचे औचित्य साधून सचिन बोलत होता. भारताने आज पर्यंत खेळलेल्या ९९९ एकदिवसीय सामन्यांपैकी सचिनने सर्वात जास्त ४६३ वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

भारताच्या १००० व्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलताना सचिन म्हणाला कि, ” जरी भारत १९८३ चा विश्वचषक जिंकला होता तरी १९९६ च्या विश्वचषका नंतर भारतातील क्रिकेट मैदाने सामना चालू असताना पूर्ण क्षमतेने भरू लागली, आणि हा बदल डोळ्यांना स्पष्टपणे जाणवणारा होता असेही सचिन तेंडुलकर म्हणाला. सचिन तेंडुलकर याने आता पर्यंत सर्वात जास्त ४६३ वेळा भारताचे एकदिवसीय सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि १८,४२६ धावा सुद्धा केल्या आहेत.

      महत्वाच्या बातम्या :