Share

“राहुल द्रविडने सौरव बद्दल…” ; माजी व्यवस्थापकाचा धक्कादायक खुलासा

Published On: 

मुंबई: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे नावाची चर्चा सध्या संपल्या संपत नाहीये. कोणत्या ना कोणत्या कारणाने ते वादात येत आहेत तर कधी कोणत्या मोठ्या खुलास्यात. नुकतेच भारतीय संघाचे माजी व्यवस्थापकांनी लिहलेल्या एका पुस्तकात त्याच्या बद्दल अजून एक खुलासा झाला आहे.

राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेट संघात खेळलेले दोन उत्कृष्ट फलंदाज आहेत. या दोघांनी एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि पुढे ते महानतम खेळाडू बनले. त्यांच्या निवृत्तीनंतर आता खुलासा होत आहे की, एक वेळ अशी होती जेव्हा दोघे एकाच पानावर नव्हते. भारताचे माजी संघ व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी त्यांच्या ‘बोर्ड: टेस्ट. ट्रायल. ट्रायम्फ’ या पुस्तकात या प्रकरणाबद्दल लिहले आहे.

रत्नाकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहले ” पहिल्या वर्ल्डकपसाठी संघ निवडला जात असताना हा प्रकार घडला. तेव्हा राहुलने तत्कालीन चेअरमन दिलीप वेंगसरकर यांना कळवले होते की तीन वरिष्ठ खेळाडूंनी सचिन, सौरव आणि राहुल यांनी टी-२० वर्ल्डकपमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्यांना हा ‘तरुणांचा खेळ’ वाटत होता. त्यानुसार त्याने मला निवडकर्त्यांना कळवण्याची विनंती केली की ते तिघे आयसीसी वर्ल्डकप २००७ साठी उपलब्ध नसतील. दिलीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिघांना सोडून ३० खेळाडूंची संभाव्यांची निवड केली. नंतर, अध्यक्षांनी मला सांगितले की त्यांना सौरवचा फोन आला होता, तो म्हणाला की तो निवडीसाठी उपलब्ध आहे आणि त्याला दिलेली माहिती चुकीची आहे.” सौरव गांगुली त्या वर्ल्डकपमध्ये खेळले नव्हते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!