Share

“…तर पुरावा द्या, चौकशी करून कारवाई करू”, अजित पवारांचे ‘त्या’ आरोपांवरून सोमय्यांना आव्हान

Published On: 

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकरविरुद्ध(Sujit Patkar) पुण्यातील जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. पुण्यातील लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये कोविड घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पुण्यात जर कोविड रुग्णात भ्रष्टाचार झाला असेल तर पुरावा द्या, चौकशी करून सिद्ध झाल्यास कारवाई करू”, असे आव्हान अजित पवारांनी किरीट सोमय्यांना दिले आहे. त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान आज दुपारी ४ वाजता मी शिवाजी नगर पुणे जंबो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत पार्टनर सुजित पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. (Kirit Somaiya will file complaint against Jumbo Kovid Center scam in Pune)सुजित पाटकर यांनी
खोटे डॉक्युमेंट्स देऊन कॉन्ट्रॅक्ट मिळविला असून कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी ही तक्रार मी दाखल करणार आहे. असे ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे. दरम्यान संजय राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. तर आज त्यांच्याविरोधात कोविड घोटाळाप्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!