🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीत सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे. प्रसिध्द सेलिब्रिटी कपल अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलसह अनेक कलाकार लग्न बंधनात अडकले आहेत. आता तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) यांच्या लग्नाबाबत चर्चेला उधाण आलं आहे. मात्र तेजस्वी यावर असं काही उत्तर दिलं आहे की, चाहते चकित झाले आहेत.
दरम्यान बिग बॉस १५ (Bigg Boss 15) च्या घरात बनलेल्या तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. दोघांच्या जोडीला त्यांच्या चाहत्याने #TejRan असे नाव दिले आहे. आता बिग बॉस १५ चा प्रवास संपला आहे. तेजस्वीची सीझनचा विजेता म्हणून निवड झाली, तर करण हा दुसरा उपविजेता ठरला. शोमध्ये १७ आठवडे घालवून आणि एकमेकांवरील प्रेम व्यक्त केल्यानंतरही, तेजस्वी प्रकाश अजूनही करण कुंद्राला लग्नाच्या प्रस्तावाची वाट पाहत असल्याचं सांगितलं आहे.
बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश म्हणाली की करण कुंद्राने तिला अजून लग्नासाठी प्रपोज केलेलं नाही आणि तिला भीती आहे की करण ज्या प्रकारे शोमधून बाहेर पडताच उमरला (Umar Riaz) भेटायला आला आहे, त्यामुळे तो कदाचित तिला प्रपोज करणार नाही. शुक्रवारी त्याच्या इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान तेजस्वीने त्याच्या चाहत्यांना हे सांगितले होतं.
तेजस्वीच्या लाइव्ह सत्रात एका चाहत्याने करण कुंद्राला ‘जीजू’ म्हटले आणि करण कुंद्राबद्दल विचारले यावर ती म्हणाली करण आणि मी कसे सोबत राहु शकतो? तो अजून इथे नाही. तो आता उमरसोबत आहे. तसेच त्याने अजून मला लग्नासाठी प्रपोज केलंच नाही. विशेष म्हणजे तो उमरपासून मुक्त होण्याची गरज आहे. यानंतर करणसोबत पुन्हा एक लाईव्ह सेशन करणार असल्याचं ही तिनं चाहत्यांना सांगितलं आहे.
हत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
