राज्यात सध्या महाविकास आघाडीचे नव्हे तर टोळी सरकार आहे- चंद्रकांत पाटील

नागपूर : काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी काल(४ फेब्रु.)भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) तिरोड्याला आले होते. रहांगडाले कुटुंबाची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच यावेळी बोलत असतांना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे नव्हे तर टोळी सरकार आहे, असे पाटील म्हणाले.

यावेळी बोलत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,‘आपण केलेल्या वक्तव्याबद्दल बंड्यातात्या कराडकरांनी माफी मागितल्यानंतर देखील त्यांच्या विरोधात अद्यापही आंदोलन सुरूच आहे. खरं तर घोटाळे, भ्रष्टाचार, ईडीची कारवाई, वाईनच्या विक्रीला किराणा दुकानातून विक्री करण्यास दिलेली परवानगी याकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे याकरिता हा खटाटोप सुरू असून सत्तेवरून खेचून काढत नाही तोपर्यंत सत्ता भोगायची हे या सरकारचे धोरण आहे’, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, आम्ही आहोत म्हणून सरकार ताळ्यावर आहे. तसेच किरीट सोमय्या जे बोलतात तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पुरावे असतात. सुजित पाटकरच्या कंपनीत संजय राऊत आणि त्यांच्या मुलीची भागीदारी आहे,अशा बातम्या सध्या समोर येत आहेत. मी एवढेच म्हणेन की किरीट सोमय्या यांच्याकडे आणखी बरेच काही आहे’, असेही पाटील यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: