🕒 1 min read
मुंबई: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी राजीनामा दिला आहे. लँगरच्या राजीनाम्याचे कारण त्यांच्या करारबद्दल झालेला वाद आहे. ऑस्ट्रेलिया व्यवस्थापनसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. प्रशिक्षकपदाच्या भूमिकेसाठी त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगितले गेले होते.
डीएसईजी या लँगरच्या व्यवस्थापन कंपनीने शनिवारी कोचने राजीनामा दिल्याची पुष्टी केली. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की , “डीएसईजी पुष्टी करते की आमचे क्लायंट जस्टिन लँगर यांनी आज सकाळी ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. काल संध्याकाळी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या बैठकीनंतर हा राजीनामा देण्यात आला आहे.” लँगर यांनी शुक्रवारी क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. मेलबर्नमध्ये दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर, सीईओ निक हॉकले म्हणाले की कोचशी “गोपनीय चर्चा” सुरू ठेवण्याशिवाय कोणताही उपाय उरला नव्हता. मात्र, बैठकीच्या अवघ्या १८ तासांनंतर लँगर यांच्या राजीनाम्याची पुष्टी केली.
Cricket Australia has today accepted the resignation of men's team head coach Justin Langer. pic.twitter.com/BhjrN9kuF3
— Cricket Australia (@CricketAus) February 5, 2022
लँगरच्या प्रखर कोचिंग शैलीने खेळाडूंना चुकीच्या पद्धतीने प्रशिक्षण दिले असल्याचे आरोप वरिष्ठ खेळाडू आणि व्यवस्थापनाने केले होते. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने अलीकडेच “विलक्षण” काम केल्याबद्दल लँगरचे कौतुक केले होते. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या कराराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मूल्यांकन प्रक्रिया करणे योग्य असल्याचे सांगितले होते. ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौर्याच्या एक महिन्यापूर्वी लँगर यांनी मुख्य प्रशिक्षकपद सोडले आहे. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील बॉल-टॅम्परिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. जून २०२२ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता. सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड हे तात्पुरत्या काळासाठी संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारतील.
महत्वाच्या बातम्या
- “यह मोदी सरकार है…कोई नही बचेगा”, मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपीच्या अटकेवर भाजपची प्रतिक्रिया
- महाशिवरात्रीपूर्वी येणार अमृता फडणवीसांचे नवे गाणे
- बंडाचा केव्हा ‘सय्यद बंडा’ झाला कळलेच नाही- अमोल मिटकरी
- “बंडातात्यांच्या विधानामागचा मास्टरमाइंड दुसराच”, बाळासाहेब पाटलांचा दावा
- नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
