Share

“ओवेसींचे भाषण ऐकून अस्वस्थ झालो आणि जीवे मारण्याचा कट रचला”, आरोपींची पोलिसांसमोर कबुली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ‘एमआयएम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी ओवेसींवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पोलीस कोठडी मिळाली असून चौकशीत त्यांनी ओवेसींचे भाषण ऐकून अस्वस्थ झालो आणि जीवे मारण्याचा कट रचला अशी कबुली दिली आहे.

मुख्य आरोपी सचिनने सांगितले की, मला मोठा राजकीय नेता व्हायचे आहे. ओवेसीचे भाषण ऐकून मी अस्वस्थ झालो. त्यामुळेच जवळचा मित्र शुभमसोबत ओवेसीच्या हत्येचा कट रचला होता, मी जेव्हा ओवेसींवर गोळीबार केला तेव्हा ते खाली वाकले. त्यामुळे मी खाली गोळी झाडली आणि मला वाटले की त्यांना गोळी लागली आहे. मग मी पळून गेलो, असेही आरोपींनी पोलिसांना सांगितले.

ओवेसींवर हल्ला करण्याची योजना अनेक दिवसांपासून सुरू होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. हल्ला करण्याची संधी शोधत त्यांच्या अनेक सभांना आम्ही गेलो होतो. मात्र, गर्दीमुळे ते होऊ शकलं नाही. नंतर जेव्हा मला कळले की ते मेरठहून दिल्लीला जाणार आहे, तेव्हा मी त्यांच्या आधी टोलगेटवर पोहोचलो आणि गाडी येताच गोळीबार केला,” असेही आरोपींनी चौकशीत सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!