लखनऊ: पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. पण यात सर्वात लक्षवेधी राज्य होते उत्तर प्रदेश. याच उत्तर प्रदेशात भाजपने सत्ता राखली आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पसंती दिली. या निकालानंतर प्रथमच योगींनी जनतेला संबोधित केले. त्या वेळी योगी म्हणाले, चार राज्यात आपली सत्ता आणण्यात भाजप यशस्वी ठरलं आहे. मोदींच्या सुशासन आणि विकासाला जनतेने आशीर्वाद दिला आहे. उत्तर प्रदेश सर्वात मोठं राज्य आहे. या राज्यात प्रचंड बहुमत दिले आहे. त्यासाठी मी उत्तर प्रदेशातील जनतेचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्याच कष्टांमुळेच भाजपला बहुमत मिळाले आणि पुन्हा सरकार बनवण्याची संधी मिळाली. या विजयाने आमच्यावर मोठी जबाबदारी पडली असून ही जबाबदारी पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत, असे योगींनी सांगितले.
पुढे बोलताना योगी असेही म्हणले कि, यंदा पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील निकाल शांततेत पार पडले. उत्तर प्रदेशातील निकालाबाबतचा भ्रम पसरविला जात होता. मात्र, जनतेने तो फोल ठरवून आम्हाला विजयी केले. राष्ट्रवाद, सुशासन आणि विकासाच्या मॉडलला जनतेने साथ दिली आहे. सबका साथ आणि सबका विकासाच्या मुद्द्यावर आम्ही चालत आहोत. आमच्या डबल इंजिनच्या सरकारने उत्तर प्रदेशात सुरक्षा, संरक्षण निर्माण केले आहे. कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी केली. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील जनतेने घराणेशाही, वंशवाद आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारून आम्हाला विजय मिळवून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

