नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील अत्यंत वाईट पराभवानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभव स्वीकारला आहे. जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारत असल्याचे त्यांनी ट्विट केले, व म्हणाले लोकांनी निवडून दिलेल्या लोकांचे अभिनंदन.
तसेच ते म्हणाले, “मी सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानतो. आम्ही यातून शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू” आत्तापर्यंतच्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाला पंजाबच्या लढाईत सर्वात अत्यंत वाईट पराभव पत्करावा लागला आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार होते, पण यावेळी आम आदमी पार्टीचा पक्ष केवळ 18 जागा हाताळताना दिसत आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशात काँग्रेस केवळ दोन जागांवर पुढे आहे. उत्तराखंड आणि गोव्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोव्यात पक्ष सध्या 12 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 19 जागांवर आघाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

