Share

सनी लिओनीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा; कारण ऐकून चाहत्यांना बसला मोठा धक्का..!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीच्या एका व्हायरल  फोटोने सध्या सगळ्यांनाच गोंधळात टाकले आहे, या व्हायरल फोटोमध्ये सनीच्या संपुर्ण अंगावर मारहाणीच्या जखमा आणि खुना दिसत आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र हा फोटो काही खऱ्या मारहाणीचा किंवा अपघाताचा नसुन सनी लिओनीच्या आगामी ‘अनामिका’ या वेबसिरीजमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

सनीची ‘अनामिका’ वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिरीजच्या प्रमोशनाला सनीने सुरूवात केली आहे. ‘अनामिका’ वेबसिरीज १० मार्चला  एमएक्सवर प्रदर्शित होणार आहे.सध्या सनी लिओनी आपल्या या आगामी वेब सिरीजचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडिया अकांउंटवरुन तिने मारहाणीचे आणि अंगावर जखमा असलेले फोटो शेअक करण्याचा धडाका लावला आहे.

https://www.instagram.com/p/Ca4_GJ_LwUN/?utm_medium=copy_link

नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सनी रुग्णालयाच्या बेडवर झोपलेली दिसत होती आणि तिच्या पाठीवर तसेच चेहऱ्यावर  जखमा दिसत होत्या. हा फोटो पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल, इतक्या त्या जखमा भयंकर दिसत होत्या. मात्र हा फोटो तिच्या वेबसिरीजच्या प्रमोशनचा असल्याची माहिती समजल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास  सोडला. आता सनीच्या या  वेबसिरीजची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली  आहे. यामध्ये सनीसोबत राहुल देव, सोनाली सहगल, अयाज खान आणि शहजाद शेख असे प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!