🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा केवळ त्याच्या अभिनयासाठी नव्हे, तर त्याच्या अतरंगी ड्रेसमुळे देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत असतो. त्याचे कपडे प्रेक्षकांना कितीही मजेशीर वाटले असले, तरी देखील तो खूप महागडे कपडे वापरत असतो. या सगळ्या गोष्टी त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडे आकर्षित करतात. अनेकवेळा त्याला त्याच्या या ड्रेसिंगमुळे ट्रोल देखील केले जाते. कारण अशी स्टाईल बहुतांश वेळा हॉलिवूडमध्ये पाहायला मिळते. परंतु आता रणवीरमुळे ही स्टाईल बॉलिवूडमध्ये देखील आली आहे. अनेकजण असे म्हणतात की, रणवीर लोकप्रियतेसाठी असे काही कपडे घालून फिरत असतो. अशातच तो पुन्हा एकदा अशा अतरंगी कपड्यात स्पॉट झाला आहे. त्याच्या या लूकवर अनेक कमेंट्स येत आहेत.
रणवीरने गुलाबी रंगाचा एक गुच्ची सेट घातला होता. सिल्क शर्ट आणि शॉर्ट्समध्ये तो एकदम वेगळा दिसत होता. त्याच्या हा ड्रेस भलेही अतरंगी दिसत असेल, परंतु त्याच्या ड्रेसची किंमत ऐकून सगळेच हैराण होतील. त्याने घातलेल्या या ड्रेसची किंमत २ लाख रुपये एवढी आहे. रणवीरच्या चाहत्यांना त्याची ही स्टाईल खूप आवडली आहे. तसेच दुसरीकडे युजर्स त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत.
एका युजरने लिहिले आहे की, “हा तर आमच्या किचनमधील कपडा आहे.” आणखी एकाने लिहिले आहे की, “कालच आमच्या घरातील पडदे चोरी झाले आहेत. त्यांची डिझाईन देखील सेम अशीच होती.” आणखी एकाने त्याच्या कपड्यची तुलना उर्फी जावेद सोबत केली. त्याने लिहिले आहे की, “मुलांमद्ये रणवीर सिंग आणि मुलींमध्ये उर्फी जावेद यांचा फॅशन सेन्स तर देवालाच माहित.” अशापरकरे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
