मुंबई : वृद्धिमान साहा गेल्या काही महिन्यांपासून खूप चर्चेत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून साहाला वगळण्यात आल्यापासून साहाचे नाव चर्चेत आले. यादरम्यान साहाने रणजी ट्रॉफी खेळण्यासही नकार दिला होता आणि त्यानंतर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (सीएबी) त्याच्यावर जोरदार टीका केली होती. साहाने आता बंगाल संघ सोडला असून तो त्रिपुराकडून खेळताना दिसणार आहे.
साहाने बंगाल संघ का सोडला याची कारणे उघड केली आहेत. तो म्हणाला, ”जेव्हा कुशल दासने माझ्याबद्दल टिप्पणी केली तेव्हा मी अविशेक दालमिया यांना काहीतरी करायला सांगितले. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने कोणतीही कारवाई केली नाही आणि उलट त्यांना सन्मानित केले. याचा अर्थ माझ्याकडे कोणी लक्ष दिले नाही. हा प्रश्न इतका गंभीर नव्हता की तो सोडवता येत नव्हता. मला कधीच बंगाल संघ सोडावा लागेल असे वाटले नव्हते. जेव्हा मला CAB कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा मला समजले की माझी इथे इज्जत नाही.”
DOMESTIC SEASON 2022-23 ????
Wriddhiman Saha signs for Tripura as a player-cum-mentor ????
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 9, 2022
३७ वर्षीय साहाला भारतीय संघाने स्पष्टपणे सांगितले, की भविष्यात त्याची संघात निवड होणार नाही. याचा खुलासा करताना साहाने स्वतः सांगितले, की मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेच त्याला निवृत्तीचा सल्ला दिला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही साहाचा विचार करण्यात आला नाही आणि इंग्लंडमधील पाचव्या कसोटीसाठी केएस भरत आणि ऋषभ पंत यांची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

